Kaleidoscope – My new book of 40 Blogs in Marathi

Dear Readers,

A Marathi translation of my select 40 blogs will be available this month. The book published by Inking Innovations and is titled Kaleidoscope.

The translation has been done by my sister Lalita Vaidya and illustrations are by Manish Rangnekar as before.

Here is the special pre-publication offer by the Publisher for you to note

इंकिंग इनोव्हेशन्सची आगामी २ पुस्तकांची वाचकांसाठी प्रकाशनपूर्व खास सवलत…!!!

इंकिंग इनोव्हेशन्सने नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारित नवोदित तसेच नावाजलेल्या लेखकांची पुस्तके वाचकांसाठी प्रकाशित केली आहेत. पुढील महिन्यात अशीच दोन पुस्तके प्रकाशित होत आहेत. “पंख” या पुस्तकाविषयीची माहिती हि वेगळी आधीच दिली आहे.

आता जाणून घेऊया आमच्या दुसऱ्या पुस्तकाविषयी म्हणजेच डॉ. प्रसाद मोडक यांचे “कलायडोस्कोप”

आंतरराष्ट्रीय किर्तीचे डॉ. प्रसाद मोडक हे पर्यावरण क्षेत्रात गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत. त्यानिमित्ताने त्यांची जगभर भ्रमंती चालू असते. देशोदेशींची अनेक मंडळी त्याना भेटतात व प्रवासात आजूबाजूच्या लोकांचे, जागांचे व घटनांचे ते बारकाईने निरिक्षण करतात. त्यातूनच त्याना आलेले काही अविस्मरणीय व विलक्षण अनुभव आणि त्यातून उद्भवलेले काही चिंतन कथांच्या स्वरूपामधून ‘कलायडोस्कोप’ या कथासंग्रहामध्ये प्रतिबिंबित झाले आहे.

ओघवती भाषा, कौतुकास्पद साधेपणा व समयोचित मार्मिक नर्म विनोद हे या लिखाणाचे वैशिष्ट्य. या कथांमध्ये जीवनात भेटलेल्या व्यक्तींची शब्दचित्रे उत्तम उतरली आहेत. काही हृदयस्पर्शी तर काही त्या व्यक्तींच्या वैशिष्ट्यांसह हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभी राहणारी! काही कथांमध्ये कल्पनेच्या मनोर्‍यावर चढून केले गेलेले त्यांचे हितगुज हे वाचकाला एका वेगळ्याच स्तरावर घेऊन जाते.

डॉ. मोडक यांच्या कथा ह्या शब्दांच्या पलिकडे तर जातातच परंतु त्याच वेळी संस्मरणीय असा संदेश देऊन जातात. एकंदरीत मराठी वाचकांसाठी, ह्या कथा निश्चितच आनंद व प्रेरणा देणार्‍या ठरतील.

पुस्तकाचे नाव – कलायडोस्कोप
पृष्ठसंख्या – २४८
मूळ किंमत – रु. ३००.००
प्रकाशनपूर्व सवलतीचा दर – रु. १७५.००

प्रकाशनपूर्व सवलत हि १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत…!!! आपली प्रत आजच नोंदवा आणि ३१ ऑगस्टपूर्वी भारतात कुठेही तुम्ही दिलेल्या पत्त्यावर ती प्रत मिळवा. तुमचे नाव व पत्ता आम्हाला कळविण्यासाठी खालील पत्त्यावर लिहा किंवा फोन करा.
ashwiniinkinginnovations@gmail.com
or
022 24122755 / 56

प्रकाशनपूर्व किमत रु. १७५/- हि खालील खात्यात जमा करावी.

Bank Details
Name : Inking Innovation
Bank : Corporation Bank
Branch : Wadala
A/c No. : 010601601000386
IFSC : CORP0000106

The book will be released on Sunday, August 26 in Mumbai.

Advertisements